- ‘गप निघून जा, नाहितर तुझा मर्डर करेन’ म्हणत शेतकऱ्याला मारहाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०२४) :- चऱ्होलीकडून येणारा टेम्पो रविकिरण सोसायटीमध्ये इंडीकेटर न देता उजवीकडे वळत होता. त्यावेळी ‘टेम्पोचे इंडीकेटर दे’ असे फिर्यादी आरोपी चालकाला म्हणाले. त्याचा आरोपीला राग आला. ‘मी येथिल गाववाला तापकीर आहे; असे म्हणून फिर्यादीला वाईट वाईट शिवीगाळ केली. ‘तु इथून गप निघून जा, नाहितर मी तुझा मर्डर करेन’ अशी धमकी देवून फिर्यादीला हाताने मारहाण केली.
फिर्यादी खाली पडल्यानंतर आरोपी त्याच्या गाडीतील लोखंडी रॉड काढून फिर्यादीच्या डाव्या पायावर आणि डोक्यात मारला. त्यामुळे त्यांच्या डोक्यास जखम झाली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. ०८/) रोजी रात्री ९.०० वाजताच्या सुमारास रविकिरण सोसायटी, अलंकापुरम रोड, वडमुखवाडी,च-होली (बु) येथे घडला.
फिर्यादी प्रशांत दत्तात्रय गिलबिले (वय ४४ वर्षे, शेती, रा. वडमुखवाडी, च-होली) यांनी आरोपी शुभम दशरथ तापकीर (रा. काळे भिंत, च-होली) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी ३०९/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५(२), ३५२, ३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोफौ पारधी पुढील तपास करीत आहेत.