न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०२४) :- अनोळखी मोबाईलवरुन एकाने रेग्युलर कॉल, व्हॉटस्अॅप मॅसेज व व्हीडीओ कॉल केला. स्वतःला ट्रायमधुन तसेच वेगवेगळी नावे वापरुन मुंबई पोलीस क्रॉईम ब्रँचमधुन असल्याचे सांगितले. आधारकार्डचा वापर करुन सिम खरेदी केल्याचे व त्याद्वारे वेगवेगळ्या लोकांना व्हीडीओ कॉल, पोनोग्राफी, अश्लील मॅसेजेस पाठवुन मनी गॅबलींग करण्यात आल्याचे सांगत फिर्यादीविरुद्ध गुन्हा दाखल असल्याचे दाखवत त्यांची चौकशी करीत असल्याचे भासवले.
तसेच फिर्यादीच्या आधारकार्डची माहीती घेवुन त्यामध्ये मनी लॉन्ड्रीगची केस दाखल असल्याचे त्यात ‘मुख्य आरोपी नरेश गोयल हे असुन त्याचे इतर ०५ साथीदार आहेत. त्या प्रकरणात तुमचे आधारकार्ड वापरुन कॅनरा बँकेत खाते उघडण्यात आले आहे व त्यात तुम्ही सस्पेक्ट आहात’ असे खोटे सांगुन व तशी बनावट कागदपत्रे फिर्यादीच्या व्हॉटस्अॅपवर पाठवली.
फिर्यादीचे बँक खाते, म्युच्युअल फंड यांची माहीत घेवुन फिर्यादीच्या खात्यातील व म्युच्युअल फंडामधील रक्कम कोठुन आली? याची तपासणी करणे आवश्यक असल्याचे सांगुन फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीस दोन वेगवेगळ्या बँक खात्यात अनुक्रमे २५,००० व ४५,००,००० रुपये अशी रक्कम ट्रान्सफर करण्यात सांगुन फिर्यादीचे पैसे परत न करता फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. ०१) रोजी ते (दि. ०४) रोजी पिंपरी येथील ब्रँचमध्ये घडला. फिर्यादी (वय ६५ वर्षे, धंदा सेवानिवृत्त, रा. पिंपरी) यांनी आरोपी मोबाईल क्रं. ९४५७५४९७३० व ७२३७८६४०६९ धारक इसम (पुर्ण नाव, वय, पत्ता माहित नाही) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ६३२/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (३), ३१८ (२), ३३६ (२), २०४, तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६६ (क) व ६६ (ड) प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. धनंजय कापरे पोलीस निरीक्षक (गुन्हे) पुढील तपास करीत आहेत.