- पिस्टलचा धाक दाखवुन तिघांनी जबरदस्तीने केली कपड्यांची लुट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०२४) :- तीघजण कपड्याच्या दुकानात आले. दुकानदाराकड ‘आम्हास कपडे दाखव’ अशी मागणी केली. त्यांना कपडे दाखवले असता त्यांना ते पसंत पडल्याने त्यातील एकाने ट्रायल रुमध्ये जावुन शर्ट व पॅन्ट अंगात घातला. इतर दोघांनी कपडे पसंत केले.
दरम्यान ‘याचे पैसे आम्ही तुला देणार नाही’ असे म्हणत दुकानदारासोबत हुज्जत घातली. ‘तुम्हाला कपडयांचे पैसे दयावे लागतील’ असे दुकानदार म्हणाले. त्यावर त्यांच्यापैकी दोघांनी त्यांच्या शर्टच्या आतुन कंबरेला लावलेले पिस्टल बाहेर काढले. ते पिस्टल दुकानदारावर रोखुन “आता तुला खल्लास करुन टाकतो. तुला पैसे मिळणार नाहीत. तुला आम्ही कोण आहोत हे माहीती नाही, आम्ही नायर कॉलनीमध्ये मर्डर केला आहे. तुला कोठे जायचे तेथे जा. आम्ही या भागातले डॉन आहोत” अशी धमकी देत एकुण ४००० रुपये किंमतीचे कपडे पिस्टलचा धाक दाखवुन जबरदस्तीने घेवुन गेले, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. १०) रोजी रात्री ९.१५ च्या सुमारास रॉयल एस. के. मेन्स वेअर, अष्टविनायक चौक, संगम सोसायटी, मोरेवस्ती, चिखली या कपड्याच्या दुकानामध्ये घडला.
फिर्यादी प्रफुल्ल मधुकर कांबळे (वय ३० वर्षे, धंदा कापड दुकान) यांनी अंदाजे २० ते २२ वयोगटातील अनोळखी ३ इसमांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. चिखली पोलिसांनी ३९२/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३५१ (२) (३), ३(५), आर्म अॅक्ट कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ (१), १३५ प्रमाणे सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मासाळ पुढील तपास करीत आहेत.












