- वासुलीजवळील सावरदरी येथील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०२४) :- स्कुटीवरून दोघेजण महाळुंगे एच.पी. चौक, वासुली मार्गे मिंडेवाडी येथे जात होते. त्यावेळी पाठीमागुन येणारा पाण्याच्या टँकरच्या चालकाने त्याच्या ताब्यातील टँकर हा भरधाव वेगात चालवला. स्कुटीला धडक देवुन अपघात केला.
अपघातात पवन राजेश गेडाम (वय २९ वर्षे रा. महाळुंगे ता. खेड जि.पुणे) याच्या पोटावरुन चाक गेले. वाहनचालक गंभिर दुखापतीस तसेच त्याच्या मरणास कारणीभुत झाला आहे, असं फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. ११) रोजी दुपारी ११.४७ च्या सुमारास सावरदरी गावचे हददीत एअर लिक्वीड चौक, ता. खेड जि.पुणे येथे घडला.
फिर्यादी भिम शेषराव जाधव (वय १९ वर्षे, धंदा ड्रायव्हर, रा. महाराष्ट्र बॅकचे शेजारी रुममध्ये महाळुंगे) यांनी आरोपी विशाल ज्ञानेश्वर तरस (वय ३७ वर्षे रा. सावरदरी ता. खेड जि.पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ४३०/२०२४बी.एन.एस. कलम-१०६ (१) २८१,१२५ (ब), मो.वा.का. कलम-१८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोसई / जाधव, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हे पुढील तपास करीत आहेत.












