- मुलांचा शाळेत प्रवेश घेण्याआधी खातरजमा करा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनधिकृत शाळांबाबत विशेष मोहीम राबविली होती. या मोहिमेत अनधिकृत आढळून आलेल्या शाळांची यादी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी जाहीर केली आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागाने पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून ४९ शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर केले आहे. त्यात पिंपरी चिंचवड शहरातील या शाळा अनधिकृत ठरविण्यात आल्या आहेत.
पोदार इंटरनॅशनल स्कूल, ताथवडे, पिपल ट्री एज्युकेशन ट्रस्ट, पिंपळे निलख, श्री चैतन्य इंग्लिश मीडियम स्कूल, पिंपळे निलख, आयडियल इंग्लिश स्कूल, पिंपळे गुरव, सपलिंग्स इंग्लिश मीडियम स्कूल, चिंचवडेनगर, लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, चिंचवडेनगर, नवजित विद्यालय, वाल्हेकरवाडी, किड्सजी स्कूल, पिंपळे सौदागर, एम. एस. स्कूल फॉर किड्स, सांगवी, क्रिस्टल मॉर्डन स्कूल, चऱ्होली, माऊंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल कासारवाडी, ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल चिंचवड.


















