न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०२४) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात डेंग्यु आजाराच्या निदानासाठी एकुण ३००२ संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविले असता त्यामध्ये डेंग्यु आजाराचे २३ रुग्ण दुषित आढळुन आलेले असून या रुग्णांपैकी ११ पुरुष व १२ महिला रुग्ण आहेत.
आकुर्डी येथिल विवेकनगर परिसरातील रहिवाशी सोसायटी मधिल ०३ रुग्णांना डेंग्यु सदृष्य आजाराची लक्षणे असल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्ण सद्यस्थितीत डेंग्यु संशयित असुन त्यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णांचा डेंग्यु चाचणीचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
वैद्यकिय विभागामार्फत सदर रहिवाशी सोसायटी व शेजारील रहिवाशी सोसयटी येथे किटकशास्त्रीय सर्व्हेक्षण केले असता त्यांच्या शेजारी बांधकाम साईट येथे डेंग्यु आजारास कारणीभुत असलेल्या डासांच्या अळया आढळुन आलेल्या आहेत. या ठिकाणी औषध फवारणी,औष्णीक धुरिकरण करुन डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात आले. तसेच बांधकाम साईट कडुन र.रु १०,००० हजार इतका दंड वसुल करण्यात आला आहे.
डेंग्यु या आजाराची लक्षणे खालीलप्रमाणे असून लक्षणे आढळून येताच नजीकच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयातून औषधोपचार व सल्ला घ्यावा.
• तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायुदुखी व सांधेदुखी
• उलट्या होणे, डोळयांच्या आतील बाजुस दुखणे.
• अंगावर पुरळ, अशक्तपणा, भुक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे
• त्वचेखाली, नाकातुन रक्तस्त्राव होणे व रक्ताची उलटी होणे. रक्तमिश्रीत / काळसर रंगाची शौचास होणे, पोट दुखणे, रक्तदाब कमी होणे, हातपाय थंड पडणे.
• काही रुग्णांमध्ये या दरम्यान रक्तजलाचे प्रमाण कमी होऊन रुग्ण अत्यवस्थ होतो. रुग्ण बेशुध्द होऊ शकतो या गंभीर बेशुध्द अवस्थेला डेंग्यु शॉक सिंड्रोम असे म्हणतात. यामध्ये मृत्युचे प्रमाण जास्त असते.
डेंग्यु आजाराचा प्रसार डास चावल्याने होतो. यामुळे आपले घर व नजिकच्या परिसरात डासांची उत्पत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी. याकामी घरात व आजुबाजुच्या परिसरात पाणि साचुन रहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच घरातील कचऱ्याची व टाकाऊ वस्तुंची योग्य विल्हेवाट लावावी. आपल्याला डास चावणार नाहीत याची वैयक्तित खबरदारी घ्यावी.














