- आ. अमित गोरखे व पिंपरी विधानसभा भाजपाचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२४) :- स्व. गणपत तुकाराम गोरखे यांचे १२ वे पुण्यस्मरण व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य आमदार अमित गोरखे यांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील “आनंदघन वृद्धा आश्रम ” या ठिकाणी फळे व ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
अमित गोरखे म्हणाले, अलीकडच्या काळात भारतातील पारंपरिक एकत्र कुटुंब पद्धती लोप पावून विभक्त कुटुंब पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांची संख्याही वाढत आहे. छोटी छोटी कुटुंबे निर्माण झाल्याने आई-वडिलांवर एकाकी राहण्याची वेळ आली आहे. मुला-मुलींनाही स्वत:च्या आईवडिलांची जबाबदारी नकोशी वाटते. त्यामुळे त्यांना वृद्धाश्रमात पाठविण्याचा विचार वाढायला लागला आहे. मुले-मुली ज्येष्ठांना घरात ठेवतच नाहीत असे नाही; पण घरातच अपमानास्पद वागणूक देणे, दुर्लक्ष करणे, घरातील कामे सांगणे यांसारख्या गोष्टी घडतात. त्यामुळे अनेक ज्येष्ठांनाही वृद्धाश्रमच जवळचा वाटू लागला आहे. अशा वेळी त्यांना कोणातरी मदतीचा हात मिळावा या हेतूने मी व माझ्या सहकार्यांनी वृद्धा आश्रमाला भेट देऊन त्यांना फळे व ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.
यावेळी मा. नागसेविका श्रीमती अनुराधा गोरखे, पिं.चिं.भाजपा ओबीसी महिला मोर्चा शहराध्यक्ष रोहिणी रासकर, पिं.चिं. भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस प्रतिभा जवळकर, आनंदघन वृद्धा आश्रम संचालिका निशा मधुकर रसाळ, धर्मेंद्र क्षीरसागर, धरम वाघमारे, संभाजी नाईकनवरे, राजू होसमनी, धनंजय खुडे, भानुदास नेटके, प्रशांत शिंदे, संतोष चंदनशिवे, शिवण पवार, पार्थ गोरखे, गोविंद साठे, विष्णू गायकवाड, आदी उपस्थित होते.












