न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी प्रतिनिधी :- गणेशोत्सवानिमित्त कै. हनुमंतराव गंगाराम तापकीर प्रतिष्ठाणतर्फे आयोजित स्वच्छ व शांतताप्रिय सोसायटी, पोलीस आयुक्तालया मार्फत गणेशोत्सवानिमित्त घालून दिलेली मार्गदर्शक तत्वांचे पालन करणारी गणेश मंडळे तसेच प्लास्टिक व थर्माकोलविरहित गणेश सजावट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी स्वीकृत सदस्य विनोद तापकीर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. सोसायटी प्रकारामध्ये या स्पर्धेचे प्रथम रोहित पामॉलिव्ह, द्वितीय भक्ती क्लासिक, तृतीय गोल्डन सोसायटी यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.
तसेच गणेश मंडळांमध्ये प्रथम क्रमांक नढेनगरचा जाणता राजा मित्र मंडळाने तर द्वितीय क्रमांक ज्योतिबा नगरचे अमरदीप मित्र मंडळाने व तापकीर नगरच्या भैयावाडी मित्र मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला. या सर्व गणेश मंडळांना मा. नगरसेवक व युवा उद्योजक शंकर जगताप यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास नगरसेवक व ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेविका सविताताई खुळे, उषाताई काळे, स्वी. नगरसेवक देविदास पाटील, बीभीषण चौधरी, युवा नेते किरण नढे, आझाद मित्र मंडळाचे अध्यक्ष अतुल नढे, सागर तापकीर, चंद्रकांत तापकीर, विकास एकशिंगे, आकाश भारती, युवा नेते निलेश तापकीर व प्रभागातील आदी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वी. नगरसेवक विनोद तापकीर यांनी आभार प्रदर्शन केले.