न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी : आज गुरुवार दिनांक २७ रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते उद्या शुक्रवार दिनांक २८ रोजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत फार्मसी संघटनेच्या वतीने एक दिवसीय ”ऑनलाईन फार्मसी” विरोधात बंद पुकारण्यात आला आहे.
तरी या वेळेत देशातील सर्व मेडिकल्स बंद राहणार असून, अत्यावश्यक ब्लड प्रेशर (B.P), शुगर आणि नियमीत लागणारी औषधे आधीच घेण्याचे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. बंदच्या काळात औषधे कोठेही मिळू शकणार नाहीत त्यामुळे पुढील होणारी गैरसोय टाळून संघटनेस सहकार्य करण्याचे आवाहन ऑल इंडिया फार्मसी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.