न्यूज पीसीएमसी नेटर्वक
थेरगाव प्रतिनिधी:- थेरगाव परिसरातील जय मल्हार नगरमधील शिवशंभो सोसायटीजवळील ट्रान्सफाॅर्मला सकाळी 8.30 च्या दरम्यान अचानक आग लागली.
या आगीचे लोण शेजारीच असलेल्या शिवशंभो सोसायटीजवळ पोहचले व मोठा हाहाकार उडाला, नागरिकांमध्ये त्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
या आगीत एकुण 5 ते 6 लाखांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असुन अद्याप जिवितहानीचे वृत्त नाही.
परिसरातील हा प्रकार नगरसेवक कैलास बारणे यांना माहित होऊन त्यांनी तात्काळ आग्निशामक दलाला पाचारण केले व आगीवर नियंत्रण मिळवले.