न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२५) :- पिंपरीतील कमला नेहरू शाळेच्या गेटसमोर सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात दारूची बाटली मारून त्याला गंभीर जखमी करण्यात आलं आहे.
शाळेचे गेट उघडण्याच्या कारणावरून हा प्रकार शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडलेला आहे. घटनेनंतर आरोपीने पलायन केले आहे. सुरक्षा रक्षक रविराज जामजगली यानी आरोपी नेल्सन याच्या विरोधात फिर्याद नोंदवलेली आहे.
पिंपरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दलालवाड करीत आहेत.














