न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२५) :- मर्डर केसमधून सात वर्षानंतर सुटका झाल्याचे निमित्त करीत फटाके फोडत गुन्हेगाराची मिरवणूक काढली. याप्रकरणी पोलिसांची कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या आदेशाचा भंग केला.
हा प्रकार (दि. १३) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्रिवेणीनगर येथील एसआरए बिल्डिंगच्या आवारात घडला. याप्रकरणी निगडी पोलीस शिपाई दीपक पिसे यांनी मानतेश यतनाळकर, हनुमंता यतनाळकर, महेश बोरगावकर, अकिब सौदागर, शाम येतानाळकर (सर्व राहणार निगडी) यांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना नोटीस देत समज दिली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिर्के हे करीत आहेत.














