न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी प्रतिनिधी :- जागतीक फार्मासिस्ट दिन दिनांक 25 सप्टेंबर 2018 रोजी चिंचवड येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास विजय पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद, सुशील शहा अध्यक्ष केमिस्ट असोसिएशन आॅफ पुणे डिस्ट्रीक्ट, डाॅ. आत्माराम पवार, डाॅ. मनोहर पाटील, प्रशांत हंबर, अजय दर्डा, अमोल शिनकर, तुषार कांकरिया, मनोज प्रभू व पिंपरी चिंचवड मधील फार्मासिस्ट बंधू भगिनी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे आयोजन विवेक तापकीर, उपाध्यक्ष केमिस्ट असोसिएशन आॅफ पुणे डिस्ट्रीक्ट, रवि पवार, संघटक सचिव केमिस्ट असोसिएशन आॅफ पुणे डिस्ट्रीक्ट, प्रसाद शितोळे, ईसी केमिस्ट असोसिएशन आॅफ पुणे डिस्ट्रीक्ट यांच्यावतीने करण्यात आले होते.
सर्वप्रथम दिपप्रज्वलनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला व औषधांची देवता धन्वंतरीचे पूजन करून फार्मासिस्ट प्रतिज्ञा घेण्यात आली.
यावेळी सध्यस्थितीतील फार्मसी कशी असावी? यावर विवेक तापकीर यांनी तयार केलेली शॉर्टफिल्म दाखवण्यात आली.
आत्माराम पवार यांनी दुकान कसे असावे? फार्मासिस्ट कसा असावा? या विषयावर माहितीपुरक व परखड मार्गदर्शन व्यक्त केले. तसेच प्रशांत हंबर सर यांनी विविध “post-pharmacist” या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
मनोहर पाटील यांनी आपली पेढी कशी व्यवस्थितरित्या चालवावी, पेशंट counseling कसे करावे? या विषयावर मार्गदर्शन केले.
विजय पाटील यांनी सवंग सर्व विषयावर अत्यंत मौलिक मार्गदर्शन केले.
स्वप्नील जंगम व शारदा पवार यांनी सूत्रसंचलन केले तर विवेक तापकीर यांनी आभार मानले.