न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरीतील लिंक रोड, पत्राशेड येथील धनश्री पुणेकर या लहानग्या मुलीचे अज्ञातांनी अपहरण करून खुन केल्याची घटना शहरात नुकतीच घडली. या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ आज शनिवार दि २९. सप्टें. रोजी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहरात कायदा व सुव्यवस्थेचे राज्य निर्माण करा, अन्यथा मनसेच्या वतीने कायदा हातात घेउन अत्याचार करणाय्रांचा बंदोबस्त केला जाईल, असे शहर मनसेचे अध्यक्ष सचिन चिखले म्हणाले.
आंदोलनास महिला संघटनेच्या अदिती चावरिया, अश्विनी बांगर, सीमा बेलपुरकर, अनिता पांचाल, संगीता देशमुख, शोभा चावरिया, सुनीता गायकवाड, सुजाता काटे, रुपाली गिलबिले, शहराध्यक्ष सचिन चिखले, हेमंत डांगे, रूपेश पटेकर, बाळा दानवले, राजू साळवे, राजेश अवसरे, अंकुश तापकिर, मयूर चिंचवडे, विष्णु चावरिया, दत्ता देवतरसे, विशाल मानकरी, अमित तापकिर, सचिन कलकुंबे, नीलेश नेटके, आकाश पांचाल. नारायण पठारे, परमेश्वर चिल्लरगे, दत्ता धरमे, राकेश सौदे, विकी कांबळे, विजय म्हस्के, सूरज पाथरे, सचिन मिरपगारे, नितिन चव्हाण आदी कार्यकर्ते व मनसैनिक उपस्थित होते.