- मारेकरी लंपास; पोलीस मार्गावर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मार्च २०२५) :- भोसरीतील देवकर वस्ती परिसरात अज्ञात कारणावरून अंदाजे 40 ते 42 वर्षीय व्यक्तीस ठार मारले आहे.
हा प्रकार बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आला. अंदाजे चार ते पाच इसमांनी मिळुन हे कृत्य केले असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलेला आहे.
भोसरी पोलीस मारेकर्याच्या शोधात आहेत. या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे हे करीत आहेत.

















