न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मार्च २०२५) :- तळेगाव आर्मी डेपो येथे चौघांना नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. स्वतःची ओळख पटावी यासाठी आरोपीने शासकीय कागदपत्रे दाखवत विश्वास संपादन केला.
कायमस्वरूपी नोकरीसाठी 43 लाख रुपये घेतले. फिर्यादीच्या मुलाला खोट्या सही शिक्याचे नेमणुकीचे अपॉइंटमेंट लेटर आणि अॅडमिट कार्ड देत नोकरी न लावता त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार देहुतील माळवाडी येथे सुरू होता. याप्रकरणी महिलेने आरोपी सुभाष मगन पवार (रा. खालुंम्ब्रे, तालुका खेड जिल्हा पुणे) यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे.
देहूरोड पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे हे करीत आहेत.














