न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मार्च २०२५) :- मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या सोळा वर्षीय तरुणाचं अपहरण करून त्याला पिंपरी ब्रिज खालील एका खोलीत नेले. तिथे लोकांचे पाकिटे आणि मोबाईल चोरून आम्हाला द्यायचे अशी त्याच्याकडे मागणी केली. त्यास नकार देताच त्याच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला.
त्यानंतर हातातील दांडके आणि कोयते हवेत फिरवुन आरोपींनी ‘आम्ही इथले भाई आहोत, आम्हाला भाई म्हणायचे, नाही तर मर्डर करू’ अशी परिसरातील लोकांना धमकी दिली. त्यामुळे लोकांनी घाबरून घर बंद करून घेतली.
ही घटना गुरूवारी पिंपरीतील निराधारनगर येथे दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी आयुष परदेशी याने आरोपी सचिन सुर्वे, आर्यन सुर्वे, अंकित सहाने, एक विधीसंघर्षीत बालक, गोटया उर्फ अक्षय छत्री, शितल सुर्वे, एक अनोळखी इसम यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिरकत नोंदवली आहे.
पोलिसांनी सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत तिघांना अटक केली आहे. पुढील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक कापरे हे करीत आहेत.

















