न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मार्च २०२५) :- पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. दररोज वेगवेगळे प्रकारचे गंभीर गुन्हे घडत आहेत. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे वेगवेगळ्या गुन्ह्यांचा चढता आलेख ही पोलिसांची मोठी डोकेदुखी ठरत आहे.
औद्योगिकरणात आघाडीवर असलेल्या चाकण-तळेगाव एमआयडीसी परिसरात देखील गुन्हेगारीने डोके वर काढलेले आहे. तेथील उद्योजकांना दमदाटी करणे, त्यांच्यावर पिस्तूल रोखून त्यांच्याकडून खंडाण्या गोळा करणे अशा सर्रास घटना पोलीस आयुक्तालयाच्या घडत आहेत.
दरम्यान पिंपरी चिंचवड पोलीसांनी बेकायदेशीरपणे पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या तीघा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चार पिस्तूल आणि सहा राउंड जप्त केले आहेत.
ही कारवाई अनुक्रमे चिंचवड, एमआयडीसी भोसरी, तळेगाव दाभाडे आणि महाळुंगे एमआयडीसी या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी केली आहे.
कारवाईत एकूण एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपयांचा माल जप्त करण्यात आलेला आहे.
एका विधीसंघर्षीत बालकासह चौघाच्या विरोधात पोलिसांनी वरील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. सलमान शाबीर शेख (राहणार चिंचवड), आकाश दिनकर गायकवाड (राहणार बोराटे वस्ती मोशी), आकाश बाळू थोरात (राहणार चाकण) अशी अटक आरोपींची नावे आहेत.


















