न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- स्वच्छ भारत अभियानांतर्गत अ प्रभाग अध्यक्षा व नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या वतीने मोरवाडी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी प्रभाग अधिकारी आशादेवी दुर्गुडे, आरोग्य अधिकारी एम.एम. शिंदे, बापू गायकवाड, दिपक कोठीयाना, मोरवाडी आय.आय.टी.आयचे प्रशिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
या स्वच्छता अभियानाचे आयोजन मोरवाडी न्यायालय, एम.आय.डी.सी. परिसर व आयुक्त बंगला या ठिकाणी करण्यात आले होते.
नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी यावेळी प्रभागातील नागरिकांना आरोग्य मंत्र दिला. पिंपरी-चिंचवड शहराचा आता स्मार्ट सिटीत समावेश झाला असून स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांनी आता स्मार्ट बनले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.