न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंबळी (दि. १६ जून २०२५) :- क्रेटा या फोर व्हीलर कारच्या चालकाने नियमांकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात मोशीकडुन चाकणकडे वाहन चालवुन पायी चाललेल्या दोघांना धडक दिली. त्यात फिर्यादी व त्यांचा नातेवाईक यांना गंभीर दुखापती केली. फिर्यादीचा नातेवाईक अमोल उत्तम उतेकर यांच्या मृत्युस चालक कारणीभुत झाला आहे.
कुरुळी गावचे हद्दीत चिंबळी फाटा येथे सायबा चहा समोर पुणे नाशिक हायवे रोडवर ही घटना घडली. शुभम संतोष गोळे (वय २२ वर्ष) यांनी आरोपी संदिप किसन मोरे (वय ४४ वर्ष, सध्या रा. जुन्नर ता. जुन्नर जि. पुणे, मुळगाव हातनी ता. चिखली जि. बुलढाणा) याच्या विरोधात फिर्याद दिली असून महाळुंगे एमआयडीसी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.












