न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२५) :- ‘मादरचोद येथे गाडी लावायची नाही, जर गाडी लावायची असेल तर पैसे दे, अशी धमकी देवुन आरोपी क्र १ व २ यांनी फिर्यादीचे पॅन्टचा खिशातुन जबरदस्तीने ५०० रु. काढले. तसेच आरोपी क्र ३ व विधीसंघर्षीत बालक यांनी फिर्यादीच्या गाडयावर त्यांचे हातातील लोखंडी कोयते आदळून गाडी फोडुन लाथानी खाली पाडुन तीचे नुकसान केले.
त्यानंतर हातातील कोयते हवेत फिरवत तेथे जमलेल्या लोकांकडे इशारा करुन ‘आम्ही येथील भाई आहोत, कोणी पोलीसात तक्रार केली तर आम्हाला जो नडला त्याला कायमचा तोडला’ अशी धमकी देवुन दहशत निर्माण केली. हा प्रकार बालाजीनगर भोसरी येथे घडला.
रोहीत अरुण गायकवाड (वय २७ वर्षे, धंदा-रिक्षाचालक, रा. भोसरी) यांनी आरोपी १) अशोक गोंधणे वय २० वर्षे, २) रोहीत पारवे वय २१ वर्षे, ३) अरुण गोटे वय २२ वर्षे, ४) विधीसंघर्षीत बालक यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे. एमआयडीसी पोलिसांकडून गुन्हा दाखल करीत आरोपी क्र १ ते ३ यांना अटक करण्यात आली आहे.















