न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२५) :- पिंपळे सौदागर येथील प्राथमिक शाळा क्रमांक 51 येथे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते विद्यार्थ्याना फुले देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आयोजित प्राथमिक शाळेतील मुलांचे पहिले पाऊल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. मुलांना शालेय पाठयपुस्तकांचे व शालेय वस्तूंचे किट तसेच गणवेश वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले.
याप्रसंगी पालिकेच्या संगणक विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता नीलकंठ पोमन, मुख्याध्यापिका सुरेखा गेंगजे, बालवाडीच्या पर्यवेक्षिका खंडागळे, आकांशा फौंडेशनचे सदस्य , उद्योजक सोमनाथ खेडेकर व सर्व शिक्षक वृंद तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व समिती सदस्य, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.