न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सांगवी :- सांगवी शाखेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून भव्य कर्ज व स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवीन कर्ज प्रस्ताव ग्राहकांकडून सादर झाले आहेत. तसेच स्नेह मेळाव्यास बँकेचे ग्राहक, सभासद, संभाव्य नवीन खातेदार, यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. यावेळी ग्राहकांनी त्यांची मनोगते व्यक्त करून आवश्यक सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी चालू, बचत व मुदतठेव खाते उघडण्यात आली.
मेळाव्यास बँकेचे अध्यक्ष गोरखनाथ झोळ, उपाध्यक्ष विजय देशमुख, संचालक दिलीप तनपुरे, शांताराम देशमुख, भुजंगराव खेनट, महादेव शिंदे, आदिनाथ शितोळे, तज्ञ संचालक अनिल शिंदे, मा. संचालक बाबासाहेब कदम, भरत कुंभार, उपव्यवस्थापक किसन इंगळे, शाखा व्यवस्थापक प्रकाश चव्हाण व चंद्रकांत मोरे यांनी आलेल्या ग्राहकांचे स्वागत केले व ग्राहकांचे बँकिंग सुवेधेबाबत प्रश्नांचे शंका निरसन केले.
या कार्यक्रमप्रसंगी मा. नगरसेवक अंबरनाथ कांबळे, श्रीरंग शिंदे सचिव सिद्धिविनायक पतसंस्था, अरुण भाऊ गळतगे अध्यक्ष महालक्ष्मी पतसंस्था, सखाराम रेडेकर अध्यक्ष श्रीमान योगी पतसंस्था, सुनील चौधरी अध्यक्ष उद्यम पतसंस्था, सुखदेव कातोरे, काळूराम नांदगुडे, मनोहर शितोळे, हरीश अडेसरा, सचिन साठे, साहेबराव नळगे, प्रदीप रणवरे, शेषराव चांगीरे, यशवंत यंदे, रमेश महामुणकर, आय.सी.आय.सी. व अक्सीस बँकेचे व्यवस्थापक आदी मान्यवर, खातेदारांनी उपस्थित राहून बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या व कार्यक्रमाची शोभा वाढवली










