- अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुनावळे (दि. ३१ जुलै २०२५) :- पुनावळे परिसरात भरधाव ट्रकने स्कुटीला जोरदार धडक दिल्याने एका ३३ वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरोधात रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समीना केशव कुंद्रा (वय ३३) या महिला घरगुती कामासाठी स्कुटीने जात असताना, दिनांक ३० जुलै २०२५ रोजी दुपारी २.४५ वाजता पुनावळेतील काटेवस्ती चौक ते कॉर्नर रस्त्यावर, १०८ स्ट्रीट बिल्डरच्या ऑफिससमोर त्यांना अपघात झाला.
महिंद्रा कंपनीच्या भारत बेन्झ ट्रक (क्र. MH14 HG 7907) ने त्यांना जोरात धडक दिली. ट्रकच्या चाकाखाली समीना यांचे डोके व कंबर आल्याने त्या गंभीर जखमी झाल्या व जागीच त्यांचा मृत्यू झाला.
अपघात घडल्यानंतर चालकाने घटनास्थळावर न थांबता तेथून पलायन केले. याप्रकरणी केशव कुंद्रा (रा. गायकवाडनगर, पुनावळे) यांनी तक्रार दिली असून, ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम आणि मोटार वाहन कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि कुंभार करत आहेत.












