न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ३१ जुलै २०२५) :- काळेवाडी येथे ट्रॅव्हल पॅकेज व मेंबरशिपच्या आमिषाने तब्बल २९ लाख १६ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी सोवनिर इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत भावसार (रा. वाकड) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फसवणुकीचा प्रकार २०२३ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत कोकणे चौकातील ‘विर आर्केड’ इमारतीत घडला.
आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या परिचयातील ३९ लोकांना लाईफटाईम ट्रॅव्हल पॅकेज व सदस्यत्व देण्याचे आमिष दाखवले. बनावट करारपत्र तयार करून एकूण २९ लाखांहून अधिक रक्कम उकळली.
याप्रकरणी सनी सोनावणे, गणेश पोपळघाट, विशाल दिवाण, मनोज वाल्मिकी, करण शर्मा, मिना शिंदे, आशिष जगताप, पायल दळवी, पल्लवी गावडे, आकांक्षा देशमुख, नागेश साळवी, आयेशा शेख व कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांविरोधात काळेवाडी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनि गुरव करत आहेत.












