- प्रभागातील मतदारांचा मिळतोय भरभरुन प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०९ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ च्या माजी नगरसेविका व शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ. सुलभा उबाळे यांच्या प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. “८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण” या शिवसेनेच्या ब्रीदवाक्याला प्रत्यक्ष कृतीत उतरवत सुलभा उबाळे घराघरात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. प्रभागातील मतदारांचा त्यांना भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.
किर्लोस्कर कॉलनी, तुळजाभवानी मंदिर परिसर, प्रभू रामचंद्र मार्ग, दिनेश सुपर मार्केट, बँक ऑफ महाराष्ट्र परिसर तसेच हनुमान स्वीट्स परिसरात त्यांनी केलेल्या प्रचार दौर्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या भागातील हजारो नागरिकांनी त्यांच्या कामावर विश्वास व्यक्त करत त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
प्रचारादरम्यान सुलभा उबाळे यांनी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, महिला सक्षमीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा तसेच मुलांसाठी खेळाची मैदाने यांसारख्या मूलभूत विकासकामांवर भर देत सक्षम नेतृत्वाची हमी दिली. “नुसती आश्वासने नव्हे तर प्रत्यक्ष काम करणारा लोकप्रतिनिधी हवा,” अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
माजी नगरसेविका म्हणून केलेल्या विकासकामांचा अनुभव, नागरिकांशी असलेला जिव्हाळ्याचा संपर्क आणि शिवसेनेची सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारी भूमिका यामुळे सुलभा उबाळे यांचा प्रचार अधिक प्रभावी ठरत आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकूणच, समाजकारणाला प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वामुळे येत्या निवडणुकीत सुलभा उबाळे यांना भक्कम पाठिंबा मिळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.












