- भाजपा उमेदवार डॉ. कुंदाताई संजय भिसे यांच्या विकासाच्या मॉडेलवर मतदारांचा विश्वास..
- प्रभाग २८ रहाटणी-पिंपळे सौदागरमध्ये कमळाचाच बोलबाला?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ०९ जानेवारी २०२६) :- प्रभाग क्रमांक २८ रहाटणी–पिंपळे सौदागर येथे भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत महिला उमेदवार डॉ. कुंदाताई संजय भिसे यांच्या प्रचाराला चांगली गती मिळाली आहे. भाजपच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेनुसार प्रभागात सर्वसमावेशक, नियोजित आणि पारदर्शक विकासकामे राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
गुरुवारी डॉ. भिसे यांनी भाजपचे उमेदवार माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, महिला उमेदवार अनिताताई काटे आणि संदेश काटे यांच्यासह राजश्री सिमंधर सोसायटी, साईकृपा सोसायटी, यशदा स्क्वेअर फेज १, २ व ३, पीस व्हॅली, प्राईम प्लस, रोजलँड रिदम, श्री जी विहार, साई अव्हेन्यू व साई अंगण परिसरात प्रत्यक्ष भेटी देत प्रचार केला. घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी आरोग्य, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
भाजपच्या विकास मॉडेलनुसार दर्जेदार पायाभूत सुविधा, डिजिटल सेवा, स्वच्छ आणि हरित परिसर, महिलांसाठी सुरक्षितता, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा तसेच युवकांसाठी क्रीडा व कौशल्यविकास उपक्रम राबवले जातील, असे त्यांनी सांगितले. प्रभागातील मंडईच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावून नियोजनबद्ध विकास केला जाईल. तसेच सर्व आरक्षणांचा संतुलित विकास करताना कुणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. भिसे यांनी मतदारांना आवाहन केले की, येत्या १५ जानेवारी रोजी मतदान करताना माझ्या नावासमोरील अनुक्रमांक तीन वरील ‘कमळ’ चिन्हाचे बटन दाबून भाजपला प्रचंड बहुमताने विजयी करा.












