- प्रभाग क्रमांक २२ काळेवाडीत विकासाचा झंझावात..
- भाजपमय वातावरणामुळे विजय पक्का?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०९ जानेवारी २०२६) :- भाजपच्या प्रचाराला व्यापक प्रतिसाद मिळत असून, अनुभवी व अभ्यासू उमेदवारांमुळे पक्षाची ताकद वाढली आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार माजी नगरसेवक विनोद जयवंत नढे यांनी गुरुवारी काळेवाडीतील विविध सोसायट्यांमध्ये भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत उमेदवार हर्षद सुरेश नढे, महिला उमेदवार कोमलताई सचिन काळे, नीता पाडळे उपस्थित होते.
ज्योतिबानगर परिसरातील किनोलेक्स कॉलनी, गणराज कॉलनी आणि आझाद मित्र मंडळ स्पोर्ट क्लब येथे झालेल्या भेटींमध्ये त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. रस्ते, पाणी, ड्रेनेज, स्वच्छता तसेच व्यापारी व औद्योगिक भागातील अडचणी यावर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
सायंकाळी श्री स्वामी समर्थ मंदिरात महाआरती करण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमाला स्वामी भक्तांची मोठी उपस्थिती होती. सर्व भक्तांनी एकत्रितपणे भाजपला पाठिंबा जाहीर केल्याने प्रचाराला अधिक बळ मिळाले. त्यानंतर विजयनगर शांती कॉलनी येथील इस्कॉन मंदिरात दर्शन घेऊन सामाजिक सलोखा व सांस्कृतिक मूल्यांचा संदेश देण्यात आला.
“विकास करताना परंपरा आणि श्रद्धा यांचाही आदर राखला पाहिजे,” असे विनोद नढे यांनी सांगितले. सुशिक्षित आणि उच्च विचारांचा भाजप पॅनलच प्रभाग २२ चा सर्वांगीण विकास करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आज ९ जानेवारी रोजी सायंकाळी रहाटणी येथे होणाऱ्या पंकजाताई मुंडे यांच्या भव्य जाहीर सभेस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विनोद जयवंत नढे यांनी केले आहे.












