- कविता शैलेंद्र मोरे, अंजली वाघमारे, अक्षय माछरे, जीतु पहेलानी यांना बहुमतांनी विजयी करण्याचं आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक १९ आनंदनगर–एम्पायर इस्टेट–अशोकनगर–भाटनगर येथे पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीच्या अधिकृत व पुरस्कृत उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. “सज्ज आहोत परिवर्तनासाठी, कटिबद्ध आहोत विकासासाठी!” या घोषवाक्याखाली आघाडीने मतदारांशी संवाद साधत परिवर्तनाचा निर्धार व्यक्त केला आहे. गुरुवार दि. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे.
या प्रभागातून आघाडीचे उमेदवार म्हणून वाघमारे अंजली नितिन (अ) अनुसूचित जाती – चिन्ह: कपबशी, अक्षय मनोज माछरे (ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग – चिन्ह: बॅट, मोरे कविता शैलेंद्र (क) सर्वसाधारण महिला – चिन्ह: फलंदाज, तसेच जीतु गुरुबक्ष पहेलानी (ड) सर्वसाधारण पुरुष – चिन्ह: कपबशी मैदानात आहेत.
प्रचारादरम्यान उमेदवारांनी प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा, महिला व युवकांसाठी संधी, तसेच पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन या मुद्द्यांवर भर दिला. “आपल्या माणसांची, आपल्या प्रभागासाठी आघाडी” या भूमिकेतून सुशिक्षित उमेदवार प्रभागात सकारात्मक बदल घडवतील, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
येत्या गुरुवारी मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांनी आघाडीच्या उमेदवारांना बहुमतांनी विजयी करून परिवर्तन घडवावे, असे आवाहन परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.












