न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०२६) :- पिंपरी गावातील प्रभाग क्रमांक २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे,डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे निकिता कदम यांच्या प्रचारार्थ बलदेव नगर, शास्त्रीनगर, कैलास नगर, इंदिरानगर या परिसरामध्ये प्रचारफेरी काढण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवारांना बहुमतांनी विजयी करण्याचा संकल्प केला
या प्रचार फेरीत पिंपरी गाव प्रभाग क्रमांक २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवाणी, प्रियंका कुदळे, निकिता कदम, पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, माजी नगरसेवक रंगनाथ कुदळे हनुमंत नेवाळे,श्रीरंग शिंदे, मीनाताई नानेकर, गिरिजा कुदळे, रुपेश कुदळे कल्पना घाडगे ज्योती साठे अनिता मोईकर , सोनाली कुदळे, माधुरी कुदळे तसेच राकेश मोरे, गणेश कुदळे, कुणाल सातव, रवींद्र कदम, अमोल गव्हाणे, बाळासाहेब रोकडे, विष्णू माने, सतीश घोडेराव,प्रफुल्ल ओव्हाळ, अनिल जोगदंड, सुनील जगताप, रमेश मीराणी, किचू बन्साळी,रमेश बजाज, हरेश चुगानी, घनश्याम बजाज सुरेश परदेशी,अजय गुप्ता, नीरज चावला आदी सहभागी झाले होते .
यावेळी बोलताना माजी नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले की, संपूर्ण शहरात राष्ट्रवादीमय वातावरण आहे. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता येणार आणि महापौर राष्ट्रवादीचाच होणार आहे. असा विश्वास वाघेरे यांनी व्यक्त केला.












