- विविध परिसरात गाठीभेटी; घड्याळ चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ काळेवाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मोनिका नवनाथ नढे यांचा शनिवारी विविध भागात प्रचार उत्साहात पार पडला. स्वामी समर्थ मंदिर परिसर, स्त्री हॉस्पिटल परिसर, गणेश कॉलनी तसेच विजयनगर या भागांमध्ये त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेत थेट संवाद साधला.
प्रचारादरम्यान मोनिका नढे यांनी महिलांचे प्रश्न, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य सुविधा तसेच सोसायटीतील मूलभूत समस्यांबाबत नागरिकांशी चर्चा केली. “प्रभागातील प्रत्येक घटकाचा विकास आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींना प्राधान्य देणे हेच माझे उद्दिष्ट आहे,” असे त्यांनी सांगितले. त्यांच्या साध्या संवादशैलीमुळे आणि स्थानिक प्रश्नांवरील जाणिवेमुळे नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसून आला.
स्वामी समर्थ मंदिर परिसरात झालेल्या प्रचारावेळी भाविकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. स्त्री हॉस्पिटल परिसरात महिलांनी विशेषतः आपले प्रश्न मांडत पाठिंबा दर्शविला. गणेश कॉलनी व विजयनगर परिसरातही प्रचारादरम्यान मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
प्रभागात सातत्याने संपर्क ठेवणारे, प्रश्न समजून घेणारे आणि ते सोडविण्यासाठी प्रयत्नशील नेतृत्व आवश्यक असल्याचे मत अनेक नागरिकांनी यावेळी व्यक्त केले. मोनिका नढे यांच्या प्रचारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला प्रभागात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
येत्या गुरुवारी दि. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानात घड्याळ चिन्हाला मतदान करून मोनिका नवनाथ नढे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी प्रभागातील नागरिकांना केले आहे.












