- प्रचार निर्णायक टप्प्यात; अनुभव आणि जनसंपर्कावर मतदारांचा विश्वास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. ११ जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २७ रहाटणीमध्ये चंद्रकांत नखाते यांची विजयाकडे वाटचाल अधिक भक्कम होताना दिसत आहे. निवडणुकीचा प्रचार आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, सध्याची परिस्थिती पाहता नखाते यांची आघाडी स्पष्टपणे दिसून येत आहे.
प्रभाग क्रमांक २७ मध्ये त्यांच्या विरोधात नवखा उमेदवार असल्याने चंद्रकांत नखाते यांचा विजय अधिक सोपा होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. प्रशासकीय कामकाजातील अनुभव, विकासकामांची सखोल माहिती आणि लोकांशी थेट संवाद साधणारा नेता अशी त्यांची ओळख प्रभागात आधीपासूनच आहे. एक कार्यक्षम, लोकाभिमुख नगरसेवक अशी त्यांची प्रतिमा मतदारांच्या मनात घट्ट बसलेली आहे.
प्रचारादरम्यान नवीन उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असताना, चंद्रकांत नखाते हे आधीच प्रभागातील बहुसंख्य नागरिकांशी संपर्कात असल्याचे चित्र आहे. गल्लोगल्ली, सोसायट्यांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांशी संवाद साधताना त्यांचा अनुभव स्पष्टपणे जाणवत आहे. त्यामुळे प्रचारातही ते आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे नखाते यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या प्रभागातील अनेक नागरिक आपापसात “यावेळी विजय नखाते यांचाच” अशी चर्चा करताना दिसत असून, प्रचारातील ही आघाडी विजयात रूपांतरित होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.












