- भाजपच्या चारही उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचा निर्धार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ११ जानेवारी २०२६) :- भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख विचारधारेला नागरिकांनी भक्कम पाठिंबा द्यावा, असे आवाहन स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांचे चिरंजीव आदित्य लक्ष्मण जगताप यांनी केले.
या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २८ मधून पिंपळे सौदागरमधील भाजपच्या अधिकृत महिला उमेदवार अनिताताई संदीप काटे, कुंदाताई संजय भिसे, शत्रुघ्न काटे आणि संदेश काटे या चारही उमेदवारांना बहुमताने विजयी करून पिंपळे सौदागरच्या विकासाला अधिक गती द्या, असे नम्र आवाहन त्यांनी संवाद साधत उपस्थित नागरिकांना केले.
स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे चिरंजीव आदित्य लक्ष्मणभाऊ जगताप यांनी पिंपळे सौदागर येथील सोसायटीधारकांशी सविस्तर संवाद साधला. त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष देत विकासकेंद्रित धोरणांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर परिसरात झालेल्या भेटीगाठी आणि संवाद हे केवळ औपचारिक जनसंपर्कापुरते मर्यादित न राहता, नागरिकांशी निर्माण झालेल्या आपुलकीच्या आणि विश्वासाच्या नात्याचे प्रतीक ठरत आहेत. प्रत्येक भेटीतून नागरिकांचे अपार प्रेम, विश्वास आणि सकारात्मक पाठिंबा प्रकर्षाने जाणवत असून, जनतेची ही माया आणि साथ मनापासून कृतज्ञ करणारी असल्याची भावना व्यक्त करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या संवादातून नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासाविषयीच्या भावना थेट ऐकण्याची संधी मिळाली. पिंपळे सौदागरमधील नागरिकांनी विकासकामे, नागरी सुविधा आणि भविष्यातील नियोजनाबाबत आपली मते मांडली. या संवादामुळे जनता आणि नेतृत्व यांच्यातील नाते अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले, असेही ते म्हणाले.











