- ‘आई तुळजाभवानी’ फेम पूजा काळे यांच्या भावस्पर्शी आवाहनाने परिसर भारावला..
- सुलभाताई उबाळे यांच्यासह इतर उमेदवारांना मतदानाआधीच ‘आई भवानी’चा आशीर्वाद मिळाला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. ११ जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ यमुनानगर–निगडी गावठाण येथे रविवारी झालेली शिवसेना–रिपब्लिकन सेना (आनंदराज आंबेडकर गट) यांच्या उमेदवारांची पदयात्रा केवळ प्रचार न राहता जनभावनांचा साक्षात्कार देणारी ठरली. कलर्स मराठी वाहिनीवरील आई तुळजाभवानी फेम अभिनेत्री पूजा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर भक्तीमय व भावूक वातावरणाने भारावून गेला.
या पदयात्रेत अनुक्रमांक-१ (क) उबाळे सुलभा रामभाऊ (सर्वसाधारण महिला), अनुक्रमांक-४ (ब) बोऱ्हाडे शुभांगी संजय (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) आणि अनुक्रमांक-६ (ड) शिदे तानाजी हिरामण (सर्वसाधारण) हे उमेदवार नागरिकांशी थेट संवाद साधत सहभागी झाले. सकाळी ९ वाजता निगडीतील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रा सुरु झाली. पुढे ही पदयात्रा निगडी वसाहत, स्मशानभूमी परिसर, आझाद चौक, राहुल नगर, विलास नगर, राजनगर, संजय नगर, इंदिरा नगर आणि संग्राम नगर या भागांतून पुढे सरकत असताना ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करत उमेदवारांचे स्वागत केले.
पूजा काळे यांनी केलेले आवाहन अत्यंत भावूक ठरले. “ज्याप्रमाणे आई तुळजाभवानी आपल्या भक्तांचे रक्षण करते, त्याच भावनेतून हे उमेदवार प्रभागाच्या सेवेसाठी उभे आहेत,” असे सांगत त्यांनी येत्या गुरुवारी दि. १५ रोजी ‘धनुष्यबाण’ या चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. त्या क्षणी उपस्थित भक्तांना जणू आई स्वतःच त्यांच्या समोर उभी असल्याचा भास झाला.
या भावनिक पदयात्रेमुळे सुलभा उबाळे व त्यांच्या सहउमेदवारांसाठी प्रभागात आशा, विश्वास आणि सकारात्मक परिवर्तनाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांचा वाढता पाठिंबा स्पष्टपणे दिसून येत आहे.












