- जनतेची साथ, प्रगतीची खात्री; विकासासाठी कमळाला मतदान करण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १२ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २७ रहाटणी येथे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत नखाते यांचा प्रचार जोमात सुरू आहे. जनतेची साथ आणि विकासाची स्पष्ट दिशा यावर आधारित ही प्रचार मोहीम नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करत असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रभाग क्रमांक २७ मध्ये पारदर्शक प्रशासन, सक्षम पायाभूत सुविधा आणि लोकहिताला प्राधान्य देणारी विकासकामे हीच भाजपची ओळख असल्याचे चंद्रकांत नखाते यांनी प्रचारादरम्यान सांगितले. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे, तसेच नागरिकांच्या दैनंदिन समस्या तत्काळ सोडवणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“जनतेचा पाठिंबा हीच आमची खरी ताकद आहे. प्रत्येक मत हे प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांचा लाभ प्रभागातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असा विश्वासही त्यांनी दिला.
प्रचारादरम्यान नागरिकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता प्रभागात भाजपाच्या बाजूने अनुकूल वातावरण तयार होत असल्याचे दिसत आहे. आगामी महापालिका निवडणुकीत कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून विकासाच्या या प्रवासाला साथ द्यावी, असे आवाहन उमेदवार चंद्रकांत नखाते यांनी मतदारांना केले.












