- उच्चशिक्षित, तरुण महिला उमेदवार म्हणून नागरिकांचा वाढता पाठिंबा..
- प्रभाग २७ रहाटणीमध्ये अश्विनीताईंची प्रचारात आघाडी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १२ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचा मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतशी राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. प्रभाग क्रमांक २७ रहाटणी परिसरातही अशीच स्थिती असून, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार अश्विनी चंद्रकांत तापकीर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
उच्चशिक्षित आणि तरुण उमेदवार म्हणून त्यांना प्रभागातील विविध घटकांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठी विविध उपक्रम राबवित त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. विशेषतः बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
नागरिकांमध्ये मिसळून, थेट संवाद साधत काम करण्याची त्यांची पद्धत, तसेच शांत, संयमी व सकारात्मक स्वभाव ही त्यांची मोठी जमेची बाजू मानली जात आहे. त्यामुळेच पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत उमेदवारी दिली असल्याची चर्चा प्रभागात ऐकू येत आहे.
सध्या संपूर्ण रहाटणी प्रभागात अश्विनी चंद्रकांत तापकीर या निवडून येणार आणि प्रभागात परिवर्तन घडविणार, अशी एकच चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. आगामी निवडणुकीत मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












