- ‘होम टू होम’ संवादामुळे महिला, युवक व ज्येष्ठांचा वाढता पाठिंबा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १२ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ रहाटणी–पिंपळे सौदागर येथे भाजपच्या अधिकृत महिला उमेदवार डॉ. कुंदाताई संजय भिसे यांचा प्रचार वेगाने सुरू असून, परिसरातील विविध सोसायट्यांमधून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
रविवारच्या सुट्टीचा दिवस साधून डॉ. कुंदाताई भिसे यांनी प्रभागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये इतर उमेदवार अनिता काटे, शत्रुघ्न काटे, संदेश काटे यांच्यासह प्रत्यक्ष भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी सोसायटी बैठका, महिला मेळावे आणि छोट्या संवाद कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या. पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा तसेच सुरक्षिततेसंदर्भातील प्रश्नांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली.
सामाजिक क्षेत्रातील अनुभवाचा उपयोग करून प्रभागातील मुलभूत सेवा अधिक सक्षम करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांसाठी स्वयंरोजगार, बचत गटांना प्रोत्साहन, तसेच महिला सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम राबविण्यावर भर दिला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सोसायट्यांमधील प्रचारादरम्यान महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असून, भाजपाच्या विकासात्मक कामांबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू, असे डॉ. भिसे यांनी नमूद केले.
दरम्यान प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भाजपाला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.












