- सुधारणावादी विचारसरणी आणि शिक्षणाचा आदर्श वसा जपणाऱ्या अनिताताईंच्या पाठीशी मतदार..
- पती संदीप काटे यांचाही दांडगा जनसंपर्क गाठीला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १२ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक येत्या १५ जानेवारीला होत असून, प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर–रहाटणी येथे भारतीय जनता पक्षाने सुधारणावादी विचारसरणी आणि शिक्षणाचा आदर्श वसा जपणाऱ्या सौ. अनिताताई संदीप काटे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांचा प्रचार निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

अनिताताई काटे यांनी प्रभागातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये भेटी देत थेट संवाद साधला. सोसायटी बैठका, महिला मेळावे आणि घराघरांत भेटी देत त्यांनी नागरिकांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी ठोस उपाययोजना राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
प्रचारादरम्यान त्यांचे पती संदीप काटे यांचा दांडगा जनसंपर्कही विशेष ठरत असून, त्यांच्या सक्रिय सहभागामुळे प्रचाराला अधिक बळ मिळत आहे. नागरिकांशी सातत्याने संपर्क, सामाजिक उपक्रमांमधील सहभाग आणि विश्वासार्ह संवाद यामुळे जनतेमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
भाजपाच्या विकासात्मक धोरणांचा लाभ प्रभागातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प अनिताताई काटे यांनी व्यक्त केला. “सर्वांसाठी विकास, पारदर्शक कारभार आणि शिक्षणाला प्राधान्य” या भूमिकेसह त्यांनी मतदारांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून विकासाच्या प्रवासाला साथ देण्याचे आवाहन केले आहे.












