- पावन ज्योत व झुलेलाल यांच्या साक्षीने उमेदवारांना जाहीर समर्थन..
- पिंपळे सौदागर रहाटणी प्रभागातील चारही भाजपा उमेदवारांचा विजय सुकर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १२ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ येथील भाजपच्या उमेदवारांना पिंपळे सौदागर–रहाटणीतील सिंधी समाजाने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. रविवारी आयोजित सिंधी समाजाच्या कार्यक्रमात हा निर्णय जाहीर करण्यात आला.

प्रभागात सिंधी समाज मोठ्या संख्येने असल्याने भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ. कुंदाताई संजय भिसे, अनिताताई संदीप काटे, शत्रुघ्न काटे आणि संदेश काटे यांचा विजय सुकर होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
पावन ज्योत आणि इष्टदेवता झुलेलाल यांच्या साक्षीने पिंपळे सौदागर येथील भाजपच्या चारही उमेदवारांना जाहीर बिनशर्त पाठिंबा देण्यात आला. या वेळी सिंधी समाजाचे सुशील भाटीया, प्रकाश पमनानी, सुशील बजाज, पूजा हरजानी, लतिका भाटीया तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुशील भाटीया म्हणाले, “हवा तो आती है, जाती है; बीजेपी की तो लहर चल रही है!” भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास व्यक्त करत सिंधी समाजाने एकसंघपणे पाठिंबा दिल्याने प्रभाग २८ मधील निवडणूक चित्र भाजपच्या बाजूने अधिक मजबूत झाल्याचे दिसत आहे.












