- चार संघांचा सहभाग; मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन..
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १२ जानेवारी २०२६) :- अहिर सुवर्णकार समाजाच्या वतीने आयोजित अहिर सुवर्णकार समाज क्रिकेट स्पर्धा २०२६ (तिसरे वर्ष) मोठ्या उत्साहात पार पडत असून समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग या स्पर्धेत पाहायला मिळत आहे. क्रीडा भावनेतून एकत्र येत समाजातील तरुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष भगवान वानखेडे व उपाध्यक्ष संतोष सौंदणकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी सचिव गणेश सोनार, खजिनदार शिवाजी सोनार, सहखजिनदार कैलास पैठणकर, भवन प्रमुख प्रमोद काशीकर तसेच सदस्य दीपक सोनार, सुनील निकुंभ, प्रवीण सोनार, ऋषिकेश देवरे आणि महिला अध्यक्ष स्मिता सोनार उपस्थित होते.
यंदाच्या क्रिकेट स्पर्धेत एकूण चार संघांनी सहभाग नोंदवला आहे. त्यामध्ये तोरणा टायटन, सिंहगड फलटण, जंजिरा आणि शिवनेरी या संघांचा समावेश आहे. सर्व संघांमध्ये खेळाडूंनी उत्साहाने सहभाग घेतला असून सामने अत्यंत चुरशीचे होत आहेत.
अध्यक्ष भगवान वानखेडे यांनी आपल्या मनोगतातून समाजातील युवकांनी खेळाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, संघभावना, शिस्त आणि क्रीडावृत्ती जोपासावी, असे आवाहन केले. उपाध्यक्ष संतोष सौंदणकर यांनीही स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकारी, सदस्य आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
ही क्रिकेट स्पर्धा समाजात एकोपा, मैत्री आणि क्रीडासंस्कृती वाढविण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.












