- खा. डॉ अमोल कोल्हे यांचा सवाल…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 13 जानेवारी 2026) :- पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्यात विविध आश्वासने दिली आहेत. नदी सुधार, भटक्या प्राण्यांचे व्यवस्थापन करण्याचेही आश्वासन दिले आहे. मग पाच वर्षात नक्की केले काय असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी येथे केला.
पिंपरी गावात दिव्यांगाला झालेली मारहाण, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराच्या घरावर जाऊन केलेली शिवीगाळ या गोष्टींचा उल्लेख करून डॉ. कोल्हे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी आया बहिणींकडे वाकडे नजरेने पाहणाऱ्यांचा चौरंगा केला. तसाच महिला भगिनींकडे वाकडे नजरेने पाहणाऱ्यांचा राजकीय चौरंगा झाल्याशिवाय राहणार नाही.
पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवाणी, प्रियंका कुदळे निकिता कदम, यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत खासदार कोल्हे बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवाणी, प्रियंका कुदळे निकिता कदम, माजी नगरसेवक संतोष कुदळे, मीना नाणेकर, गिरिजा कुदळे शामा शिंदे शांती सेन रंगनाथ कुदळे श्रीरंग शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी कोल्हे म्हणाले की, भाजपने सत्तेत असताना महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. पालिकेला कर्जबाजारी केले. अर्बन स्ट्रीट सीसीटीव्ही कॅमेरे, कुत्र्यांची नसबंदी अशा प्रत्येक कामात पैसे खाल्ले. एसटीपी चे काम करणाऱ्या कंपनीचा टर्नओव्हर 15 कोटींवरून 15000 कोटी वर गेला हे विकास काम म्हणायचे का असा प्रश्न करून डॉ. कोल्हे म्हणाले की डब्ल्यूटीई एसटीपी प्लांट चे थर्ड पार्टी ऑडिट केल्यास सगळे काही उघड होईल. एवढे सारे करून इंद्रायणी फेसाळते जलपर्णी येथे तेव्हा वारकरी संप्रदायाचा अपमान होत नाही का असा प्रश्न त्यांनी केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेत सत्तेवर असताना भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र भाजपने त्याला उत्तरे का दिली नाहीत असा सवाल त्यांनी केला.
रूपाली ठोंबरे म्हणाल्या की दहशतीमुळे आमची एखादी भगिनी खच्ची होणार असेल तर खच्ची होऊ देणार नाही. हा प्रकार अचानक घडला नाही तो घडवून आणला. ज्यांच्या घरात राजकीय वारसा आहे ते प्लॅनिंग करून लोकशाहीचा असा गळा दाबतात हे चुकीचे आहे असे त्या म्हणाल्या.
माजी नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले की, काही मंडळी दहशतवाद करत आहेत. त्यांनी गेल्या 35 वर्षात काय केले हे सांगितले तर मी माझी उमेदवारी मागे घेईन. असे आव्हान त्यांनी दिले.












