- मतदारांचा निर्धार; प्रभाग २८ मध्ये यंदा परिवर्तन अटळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १३ जानेवारी २०२६) :- पिंपळे सौदागर–रहाटणी प्रभाग क्रमांक २८ मध्ये भाजपच्या उमेदवार अनिता संदीप काटे यांचा प्रचार सध्या जोरात सुरू असून, घरोघरी भेटी आणि प्रत्यक्ष संवादामुळे त्यांना नागरिकांचा भक्कम पाठिंबा मिळत आहे. अनिता काटे व त्यांच्या परिवाराने गेल्या काही दिवसांत परिसरातील गल्ल्या, सोसायट्या आणि कॉलनी अक्षरशः पिंजून काढल्या. सकाळपासून रात्रीपर्यंत सुरू असलेल्या या प्रचारात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांची नोंद घेतली जात आहे.
विशेषतः पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, महिला सुरक्षेसह युवकांसाठी रोजगार व क्रीडा सुविधा या मुद्द्यांवर नागरिकांनी आपली मते मांडली. या संवादात्मक प्रचारामुळे “आपली उमेदवार” अशी भावना मतदारांमध्ये निर्माण झाली आहे. ज्येष्ठांनी अनुभवाच्या जोरावर पाठिंबा दर्शवला, महिलांनी सुरक्षितता व सोयीसुविधांबाबत विश्वास व्यक्त केला, तर युवकांनी विकासाभिमुख नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त केली.
परिसरातील नागरिकांनी अनिता काटे यांच्या साधेपणा, उपलब्धता आणि सातत्यपूर्ण संपर्काचे विशेष कौतुक केले. भाजपच्या विकासाच्या विचारधारेशी सुसंगत कामकाज महापालिकेत घडवून आणण्याचा त्यांचा निर्धार मतदारांना भावत आहे. त्यामुळे प्रभाग २८ मधून अनिता संदीप काटे यांना महापालिकेत नगरसेविका म्हणून पाठवण्याचा सर्वांचा खंबीर निर्णय झाल्याचे चित्र आहे. आता केवळ निवडणूक आणि मतमोजणी ही औपचारिकताच बाकी असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.












