- बहुमताने निवडून देण्याचा मतदारांचा निर्धार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. १३ जानेवारी २०२६) :- प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार कोमलताई सचिन काळे यांच्या प्रचाराला मोठ्या प्रमाणावर महिलांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. घराघरांत जाऊन संवाद साधत महिलांचे प्रश्न, बचतगट, स्वावलंबन, आरोग्य आणि सुरक्षितता यासारख्या मुद्द्यांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
विरोधकांवर टीका न करता सकारात्मक आणि विकासाभिमुख प्रचार केल्याने कोमलताई काळे यांच्याबाबत विश्वास अधिक दृढ होत आहे. सोमवारी झालेल्या प्रचार फेरीदरम्यान महिलांनी स्वतःहून पुढाकार घेत भाजपाला साथ देण्याची भूमिका घेतली.
“विकासासाठी कर्तृत्ववान महिला नेतृत्व हवे” अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. स्मार्ट काळेवाडीच्या संकल्पनेसाठी कोमलताई काळे या सक्षम पर्याय ठरत असल्याचे चित्र सध्या प्रभागात दिसून येत आहे.












