- विकासाचे प्रगतशील पाऊल टाकत प्रचारात आघाडी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. १३ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना प्रभाग क्रमांक २२ मध्ये विनोद जयवंत नढे यांनी विकासाच्या मुद्द्यांवर भर देत प्रभावी प्रचार करत आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.
विरोधकांवर टीका-टिप्पणी न करता स्मार्ट काळेवाडी, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा व नागरी सोयीसुविधा यावर केंद्रित प्रचार केल्याने नागरिकांकडून त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
सोमवारी दिवसभर केलेल्या भेटीगाठी दरम्यान अनेक नागरिकांनी गळाभेट घेत भावुक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. “शब्द कमी पडले, भावना बोलल्या” असे म्हणत नागरिकांनी आपला विश्वास व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
विनोद नढे यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा विश्वासार्ह पर्याय म्हणून भाजप प्रभागात अधिक भक्कम होत असल्याचे स्पष्ट होत आहे.












