- विकासकामांच्या जोरावर जनतेशी थेट संवाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. १३ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मध्ये हर्षद सुरेश नढे यांनी कार्यकर्त्यांच्या साथीने जोरदार प्रचार करत वातावरण भाजपामय केले आहे.
युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या हर्षद नढे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागातील विकासकामे, स्मार्ट सिटी संकल्पना आणि भविष्यातील नियोजन यावर भर दिला आहे. विरोधकांवर आरोप न करता कामाच्या माध्यमातून विश्वास निर्माण करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
सोमवारी दिवसभर चाललेल्या प्रचारात कार्यकर्ते, हितचिंतक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भाजपाचे पारडे अधिक जड होत असल्याचे दिसत आहे. विकासाभिमुख आणि सकारात्मक राजकारणाचे प्रतीक म्हणून हर्षद नढे प्रभागात प्रभावी ठरत आहेत.












