मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ फेब्रुवारी २०२६) :- पिंपळे निलख येथिल दादा घाट (स्मशानभुमी) ते शहिद अशोक कामटे उदयान समोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर धुळ साचलेली आहे. रस्त्याने वाहने भरधाव वेगाने जातात तेव्हा रस्त्याच्या बाजूला असलेली धुळीचे कण हवेत मिसळतात. त्यामुळे श्वासाने आजार संभवतात. त्यामुळे तातडीने ही रस्त्यावर येणारी धुळ बंद करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी महापालिकेकडे केली आहे.
निवेदनात महापालिकेचे सहाय्यक आयुक्त ‘ड’ क्षत्रिय कार्यालय यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सदर प्रकार वेळोवेळी आपल्या अधिका-यांच्या निदर्शनास आणून दिला आहे .तरी देखील हा प्रश्न मार्गी लागला नाही. आपण लक्ष घालून १५ दिवसात समस्या मार्गी लावा. अन्यथा १६ फेब्रुवारीला आम्ही श्रीपती टकुले चौक येथे रस्ता रोको करू, असा इशारा दिला आहे.












