- सुरक्षा उपाययोजना न केल्याचा आरोप…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ फेब्रुवारी २०२६) :- चिखली येथील साने इंडस्ट्रीज परिसरातील एका प्रेस टूल्स निर्मिती कारखान्यात निष्काळजीपणामुळे कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास नवतेज प्रेसिंग, साने इंडस्ट्रीज, चिखली येथे ही घटना घडली. कंपनीत वाहनांसाठी लागणारे पार्ट्स तयार करण्याचे काम सुरू असताना मशीनमधून पार्ट उडून कामगार जखमी होण्याची शक्यता असल्याचे माहिती असूनही सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, असा आरोप आहे.
या घटनेत कामगार सुनील व्यंकट बडघे (वय ४१, रा. मोरे वस्ती, चिखली) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस अक्षय सोपान शिळीमकर (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारखान्याचे मालक अशोक जगन्नाथ वराडे (वय ७०, रा. संभाजीनगर एमआयडीसी, चिंचवड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपीस अद्याप अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिळीमकर करीत आहेत.












