न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०२ मार्च २०२६) :- वाढत्या वयात मुत्रविकार टाळण्यासाठी पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करणे, संतुलित आहार ठेवणे तसेच निर्व्यसनी राहणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मुत्ररोग तज्ञ डॉ. मयूर नारखेडे यांनी केले.
पिंपळे सौदागर येथील ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनच्या वतीने आयोजित ” ज्येष्ठांमधील मुत्रविकार ” या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुभाषचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनच्या नामफलकाचे अनावरण भाजपाच्या नगरसेविका डॉ. कुंदा संजय भिसे आणि डॉ. मयूर नारखेडे यांच्याहस्ते करण्यात आले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सखाराम ढाकणे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले.
कै. बाळासाहेब कुंजीर क्रिडांगणावर झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी रविंद्र संदानशिवे, अनिल कुलकर्णी , सुभाष विधाते, सुहास पाटोळे, नीता गुप्ता, रेखा येळंमकर यांनी हिंदी, मराठी गाणी सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भामिनी महाले निर्मला कासार, आणि शोभा राजगुरे यांनी केले तर उपाध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलिप चौगुले, अनिलकुमार शाह, विवेकानंद लिगाडे, अनिल कुलकर्णी, रमेश चांडगे, अशोक कलाल, विमल मोंढेकर या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.












