न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ७ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी संजय पटनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या स्वाक्षरीने त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. पटनी हे आमदार महेश लांडगे यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून ओळखले जातात.
गेल्या १२ वर्षांपासून ते भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असून विविध संघटनात्मक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला आहे. यापूर्वी त्यांनी प्रसिद्धीप्रमुख म्हणूनही काम करत पक्षाच्या निवडणूक आणि संघटनात्मक उपक्रमांमध्ये प्रभावी भूमिका बजावली आहे.
दरम्यान, अरुण पाडुळे यांची भाजपा क्रीडा प्रकोष्ठ शहराध्यक्षपदी, प्रमोद परदेशी यांची दिघी-गव्हाणेवस्ती-गवळीनगर मंडलाध्यक्षपदी तर अजय साने यांची चिखली-कृष्णानगर मंडलाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत संघटन अधिक मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याची भावना संजय पटनी यांनी व्यक्त केली.












