- रम्बलर पट्टे व सावधानतेचा फलक नसल्याने अपघाताची भीती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ७ मार्च २०२६) :- पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकाकडून कासारवाडीकडे जाणाऱ्या पुलाच्या वळणावर गतीरोधक आणि आडवे पांढरे रम्बलर पट्टे नसल्यामुळे हा रस्ता धोकादायक बनला असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने वाहनांचा वेग जास्त असतो.
या ठिकाणी “अपघाती वळण” असा सावधानतेचा फलकही नसल्याने समोरून येणारी वाहने अचानक समोर येतात. त्यामुळे वाहनचालकांना वेळेवर अंदाज येत नाही आणि अपघाताची शक्यता निर्माण होते.
नागरिकांनी प्रशासनाने तातडीने या वळणावर गतीरोधक, पांढरे रम्बलर पट्टे तसेच सावधानतेचे फलक बसवावेत, अशी मागणी केली आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.












